आज रात्री 10 वाजता निघणार अंत्ययात्रा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुधा वसंत तायशेटे ( वय वर्षे 89 ) यांचे वृद्धापकाळाने वैद्यकीय उपचारा दरम्यान आज 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री 10 वाजता निघणार असून कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजीवनी हॉस्पिटल चे डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली बाजारपेठ मधील तायशेटे मेडिकल चे मालक सुहास तायशेटे, तसेच शरद तायशेटे यांच्या त्या आई होत.पश्चात मुलगे, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे.











