सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या नाटेकर सर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आज रविवार दि. 19 मार्च रोजी होणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांच्याहस्ते हा कार्यक्रम कणकवली तालुका स्कूल, आचरा रोड येथे सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माधुरी महेंद्र प्रतिष्ठानने केले आहे.
माधुरी-महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने हा ग्रंथ प्रकाशित होत असून डॉ. सई लळीत यांनी तो संपादित केला आहे. त्यात 28 मान्यवरांचे लेख व साठहून अधिक छायाचित्रे आहेत. यामध्ये कमलताई परुळेकर, अजय कांडर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, चारुशीला देऊलकर, अँड. नकुल पार्सेकर, वैशाली पंडित, प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत, विनायक मेस्त्री, विजय सावंत यांच्या लेखांचा समावेश आहे शिक्षण, समाजसेवा, राजकारण, पर्यावरण रक्षण आधी विविध क्षेत्रात कार्य केलेले प्राचार्य नाटेकर सर आपल्याला कसे भावले, याचे वर्णन या लेखकांनी आपल्या लेखांमधून केले आहे. हा स्मृतीग्रंथ म्हणजे प्राचार्य नाटेकर सर यांच्या कार्याचा दस्तऐवज आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माधुरी महेंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप नाटेकर व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.