वाडी- वाडीवर दिव्यांची रोषणाई, गाण्यांची- फराळाची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी, मंगलाष्टकांची चढाओढ उत्साहात —
फोंडाघाट (प्रतिनिधी) : द्वादशीपासून त्रिपुरारी पाैर्णिमे पर्यंत सुरू राहणाऱ्या, घरोघरीच्या तुलसी विवाह चा शुभारंभ फोंडाघाट मध्ये संध्याकाळी गोरज मुहूर्तावर करण्यात आला. बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिर येथे बालगोपाळ मंडळाच्या अपूर्व उत्साहात,गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, तुलसी विवाह संपन्न झाला. यावेळी पेठेतील असंख्य भावीक -वराडी उपस्थित होते. गोविंदाss गोपाळाsss च्या जयघोषात चुरमुरांच्या उधळणीत प्रसाद- फराळ वाटप करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हवेली नगरमध्ये श्री साई मंदिर येथे जोशी गुरुजींनी तुलसी विवाह यथाविधी संपन्न केला. यावेळी हवेली नगर मधील ग्रामस्थ भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचक्रोशीतील वाडी वाडीवर सुद्धा रात्री उशिरापर्यंत मंदिरातील विवाह संपन्न झाल्यावर, घरोघरी तुलसी विवाह चा जल्लोष होता.काही ठिकाणी स्पीकरवर विवाह गीते आणि ग्रामीण लोकगीतांची साथ, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी पहावयास मिळाते. अबाल,- वृद्धांसह युवाईच्या, मंगलाष्टकांच्या चढाओढी लक्षणीय होत्या. कोकणात संस्कृतीची जपणूक, यामधून पुढील पिढीकडे हस्तांतरित होताना दिसते. पहाटेपर्यंत सुरू असलेला हा जल्लोष टिपरापर्यंत वाड्या वाड्यावर सुरू असेल. यातच कोकणातील जत्रोत्सवाला सुरुवात होते..