श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने मनाचे श्लोक पठण स्पर्धा

2 डिसेंबरला होणार स्पर्धा, चिंदर गावातील 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय चिंदर या संस्थेमार्फत सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता. केंद्र शाळा चिंदर नं १ येथे चिंदर गाव मर्यादित अंगणवाडी ते चौथी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी “मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा” आयोजित केली आहे. सदर स्पर्धा खालील तीन गटात घेतली जाणार आहे.
गट क्र.१- अंगणवाडी/बालवाडी-पहिले ५ श्लोक, गट क्र.२- १ ली ते २ री ६ ते १५ श्लोक, गट क्र.३- ३री ते ४ थी १६ ते २५ श्लोक,

विजेत्यांना अंगणवाडी/बालवाडी- १०० रू च्या वर किमतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र, १ ली ते २ री- प्रथम क्रमांक ३००, द्वितीय क्रमांक २००, तृतीय क्रमांक १०० रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र, ३ री ते ४ थी – प्रथम क्रमांक ५००, द्वितीय क्रमांक ३००, तृतीय क्रमांक- २०० रुपये किमंतीचे शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.

तरी प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोन विद्यार्थी पाठवावे, सर्व शाळांनी स्पर्धकांची यादी दि.२७/११/२०२४ पर्यंत १) सौ. स्वरा शिशिर पालकर-ग्रंथपाल-9404194740) केंद्रप्रमुख-केंद्रशाळा चिंदर नं.१, प्रसाद चिंदरकर, ९४२३८०५८९४, ३) सौ. मनवा चिंदरकर-७५८८९६३२३१, ४) भूषण दत्तदास-९४२०७१५४६१ यांच्याकडे नोंदवावी, तरी जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेच्या कार्यकारिणी, सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!