आमदार नितेश राणे व्यापारी व नागरिकांशी साधला संवाद..
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी,शिवसेना आर पी आय महायुतीचे उमेदवार भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळी १०.३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी आमदार नितेश राणे यांनी येथील नागरिक व व्यापारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी कणकवली तालुका भाजप अध्यक्ष श्री दिलीप तळेकर,शिवसेना शिंदे गटाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,शिवसेना पदाधिकारी श्री मंगेश ब्रम्हदंडे,श्री गुरुप्रसाद शिंदे,श्री वायंगणकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर ढेकणे,माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत, प्रवीण लोकरे,नंदू कोरगावकर,भाऊ राणे,माजी प.स सदस्य सौ तृप्ती माळवदे,दादा कर्ले, श्री रफिक नाईक,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,कुरांगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बबलू पवार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, वायगणी सरपंच प्रताप फाटक, नडगिवे सरपंच माधवी मण्यार,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,चींचवली सरपंच अशोक पाटील,वारगाव उपसरपंच श्री नाना शेट्ये,माजी सरपंच एकनाथ कोकाटे,सुरेंद्र कोरगावकर,वीरेंद्र चिके,संकेत लोकरे भाजप महिला कार्यकर्त्या उज्ज्वला चिके,आरती गाठे,मनाली होनाळे,दक्षता सुतार,शितिजा धुमाळे,सोनल लोकरे,साधना धुमाळे,धनश्री ढेकणे,अमिषा गुरव,अस्तली पवार,निशा शेलार, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल सूर्यकांत भालेकर,राजा जाधव, यांसह पप्पू रायबागकर, अमोल गुरव,ऋषिकेश राऊत,रामा पांचाळ,गणेश लवेकर,राज गुरव, गौरव ढेकणे,शेखर शिंदे,शेखर कांबळी,इस्माईल मुकादम,अजित गुरव,किशोर माळवदे,अमित मांजरेकर,धोंडीराम साटविलकर, मोहन पगारे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
“फक्त निवडणुकांच्या काळात मतदारांना व नागरिकांना नमस्कार करण्यासाठी व खोट्या भुल थापा मारण्यासाठी येणारे उमेदवार आम्ही नसून जनतेच्या सुखदुःखात नेहमी अडीअडचणी केव्हाही धाऊन येणारे लोकप्रतीनिधी आम्ही असून खारेपाटण नागरिकांच्या विकसासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन यावेळी महायुतीचे आमदार नितेश राणे यांनी दिले.”यावेळी खारेपाटण केदारेश्वर मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीची सुरवात करण्यात आली. खारेपाटण एस टी बस स्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपथर बंदर पर्यंत रॅली काढण्यात आली.यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हमारा आमदार कैसा हो नितेश राणे जैसा हो .. महायुतीचा विजय असो.. अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.रॅलीत मोठ्या संख्येने खारेपाटण विभगातिल महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.