खारेपाटण येथे ६८.८२ % टक्के मतदान

खारेपाटण मध्ये स्त्री – पुरुष समान मतदान, ११०७ + ११०७ = २२१४ एकूण मतदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील खारेपाटण गावात एकूण एकूण ५ मतदान केंद्रावर मिळून ६८.८२% टक्के एवढे मतदान झाले असून विशेष बाब म्हणजे खारेपाटण गावात स्त्री पुरुष समान मतदान झाले असून एकूण मतदाना पैकी स्त्रिया -११०७ तर पुरुष – ११०७ असे समान मतदान होऊन टोटल मतदान २२१४ इतके मतदान झाले आहे.सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

खारेपाटण गावात सर्वाधिक मतदान खारेपाटण जि.प.केंद्र शाळा मतदान केंद्र क्र.१९६ येथे ७९.४३% एवढे मतदान झाले. तर बूथ निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे —
खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्र क्र.२६८/१९९ (पंचशील नगर खारेपाटण ते रामेश्वर नगर खारेपाटण) या केंद्रावर एकूण११८२ पैकी ८१० म्हणजे ६८.५२ % एवढे मतदान झाले. तर खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्र क्र.२६८/१९९ (संभाजीनगर, हसोळ टेंब कोंडवाडी) या मतदार केंद्रावर एकूण ४८२ पैकी ३७२ म्हणजे ७७.१७ % एवढे मतदान झाले आहे. तर खारेपाटण जि.प.केंद्र शाळा मतदान केंद्र क्र.,२६८/१९६ (शिवाजी पेठ, माचाळवाडी, जैनवठार) या केंद्रांवर एकूण ५५४ पैकी ४४१ म्हणजे ७९.४३%एवढे मतदान झाले.तसेच खारेपाटण बंदरवाडी उर्दू शाळा मतदान केंद्र क्र.२६८/१९७(बंदरवाडी,सम्यक नगर) या केंद्रावर ५२४ पैकी २७५ म्हणजे ५२.४८% एवढे मतदान झाले.तर खारेपाटण काझीवाडी उर्दू शाळा मतदान केंद्र क्र.-२६८/१९५ (काझीवाडी, टाकेवाडी) या केंद्रावर एकूण ४७५ पैकी ३१६ म्हणजे ६६.५२% एवढे मतदान झाले. दरम्यान खारेपाटण सर्वत्र सुरळीत मतदान पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!