आमदार नितेश राणे यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन !
फोंडाघाट (प्रतिनिधीं) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पंचायत समिती कणकवली व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज आर्ट्स-कॉमर्स- व्होकेशनल आणि सायन्स, फोंडाघाट,तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोमवार दिनांक ९ डिसेंबर ते मंगळवार १० डिसेंबर २०२४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक 9 डिसेंबर २०२४ रोजी आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते आणि श्री अरुण चव्हाण गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली डॉ.गणपती कमळकर शिक्षणाधिकारी प्राथमिक, कविता शिंपी शिक्षणाधिकारी, माध्यमिक, महेश सावंत, चेअरमन फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, संजना आग्रे -सरपंच ग्रामपंचायत फोंडाघाट यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विधान प्रदर्शनाचा मुख्य विषय “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” हा असून या प्रदर्शनात कणकवली तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती सादर करणार आहेत. तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्याही विज्ञान प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी प्राथमिक गट व माध्यमिक गटाच्या दोन गटांमधून निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.तसेच विद्यार्थी- शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण होणार आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक गटांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत.
कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा. तसेच विद्यार्थी — पालक- ग्रामस्थ- विज्ञान प्रेमी यांनी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि प्रशालेचे मुख्याध्यापक रासम व्ही .व्ही .यांनी केले आहे.












