शिरगाव हायस्कूल व शिरगाव क्रिकेट अकॅडमीच्या आर्या जाधव ही धडाकेबाज कामगिरी

देवगड (प्रतिनिधी) : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुलींच्या १९ वर्षाखालील एनव्हिटेशन लीग स्पर्धेत शिरगाव हायस्कूल व शिरगाव क्रिकेट अकॅडमीची कु. आर्या अभिजित जाधव हिने एक अद्भुत पराक्रम घडवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना तिने आपल्या चेंडूने प्रतिस्पर्धी रायगड संघाला अक्षरशः झपाटून टाकले. आर्याने ८ षटकांत केवळ २३ धावा देत तब्बल ५ विकेट्स घेतल्या आणि तिच्या अचूक माऱ्याने विरोधी संघाचा डाव गुंडाळला.

आर्याची ही कामगिरी म्हणजे शिरगावच्या भूमीने घडवलेल्या क्रिकेटप्रेमींचा अभिमान आहे. तिच्या धारदार चेंडूंच्या जादूने प्रतिस्पर्ध्यांची फलंदाजी पाय रोवून उभीच राहू शकली नाही. आर्याच्या डोळ्यातील चिकाटी, हातातील गती आणि मनातील ध्येयशक्तीने हा सामना तिने आपल्या नावावर कोरला.

शिरगाव हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या गौरव च्या या यशस्वी कामगिरीबद्दल कु. आर्या जाधवचे शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनी अभिनंदन केले आहे. शालेय क्रीडा क्षेत्रात आर्या जाधव हे नाव आता सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल यात शंका नाही
तुझ्या या यशाने तू शिरगावच्या क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. भविष्यातही तू असेच नवनवे मैलाचे दगड पार करत राहशील, अशी आशा यावेळी शिरगाव वासियांनी व्यक्त करत आर्या जाधव हिच्या यशस्वी कामगिरीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!