वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्षपदी शरद नारकर यांची निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष मधुकर जंगम यांनी या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. शिक्षक नेता म्हणून तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत शरद नारकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सेवानिवृत्त संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी शरद नारकर यांची निवड जाहीर












