खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे पाटणबाव येथील एस. टी. बस थांबा येथे प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ नुकताच माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग निधीतून सुमारे ९०,०००/- रुपये मंजूर झालेल्या पाटणबाव एस. टी. बस थांबा निवारा शेडच्या या भूमिपूजन कार्यक्रमाला कुरंगवणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र लाड, संजय लाड, संजय मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य बाबला गोसावी, मधुकर गाडे, सुहास गाडे, भालचंद्र सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या एस. टी. बस थांबा निवारा शेडचा फायदा कुरंगवणे या गावातील गाडेवाडी, लाडवाडी, जाधववाडी, सुतारवाडी, जैनवाडी, सणगरवाडी यांसह संपूर्ण पश्चिम कुरंगवणे या भागातील प्रवासी नागरिक ग्रामस्थाना होणार असल्याची माहिती कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी यावेळी दिली.