कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्वर मंदिर तृतीय वर्धापन दिनानिमित्त दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धार्मिक विधी व रुद्रयाग होणार असून दुपारी १ वाजता महाप्रसाद दिला जाईल. सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता कलमठ गावातील महिला व पुरुषांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धार्मिक विधी व रुद्रयाग होणार असून दुपारी १ वाजता महाप्रसाद दिला जाईल. दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळेत कै. वसंत विखाळे यांच्या स्मरणार्थ विखाळे परिवार आयोजित भजन स्पर्धा होणार आहे. रात्री ८ वाजता ६५ कलाकारांच्या सहभागासह ‘रंगी रंगीला महाराष्ट्र’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.











