खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील श्रावस्ती गृहनिर्माण सोसायटी क्रांतिवीर भाई बाल मुकुंद मार्ग चिंचपोकळी पूर्व मुंबई या स्थानिक महिला मंडळाच्या नवीन कार्यकारी मंडळाची नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रणाली अमित माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. श्रावस्ती सोसायटी चिंचपोकली मुंबई या स्थानिक महिला मंडळाची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष – प्रणाली अमित माने, उपाध्यक्ष – सुरेखा सुरेश माने, चिटणीस – आर्या आशिष कदम, सहचिटणीस – अपेक्षा अनिल जाधव, खजिनदार – लीना नितीन लोंढे, हिशोब तपासनीस – स्नेहल आनंद तांबे, सहा. हिशोब तपासनीस – सुवर्णा गौत्तम माने, सल्लागार – तन्वी संजय तांबे व अश्विनी वैभव कुडोपकर या सर्व नूतन महिला पदाधिकाऱ्यांचे श्रावस्ती सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.