वैभववाडी पोलिस ठाणे व प्रशालेच्या आर.एस.पी. विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून वैभववाडी पोलिस ठाणे व अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी प्रशालेच्या रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्या वतीने आज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध शस्त्रे त्यांचे प्रकार, कार्य त्यांचा वापर याबाबत पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सायबर क्राईम, वाहतूक सुरक्षा, याबाबत देखील वाहतूक पोलीस पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळणे बाबत प्रात्यक्षिक पोलिस ठाण्याच्या वतीने दाखवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील शस्त्रे हातळणीचा अनुभव घेतला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, उपनिरीक्षक किरण घाग, वाहतूक पोलीस कृष्णात पडवळ, सहकारी जितेंद्र कोलते प्रशालेचे आर.एस.पी. अधिकारी एम.एस.चोरगे, एस.एस.पाटील., एन.सी.सी. ऑफिसर एस.टी.तुळसणकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












