आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान श्री देवी भगवती माऊली चिंदर येथील वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग उद्या शनिवार 4 जानेवारी रोजी होणार आहे. श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा दशावतार नाट्य प्रयोग रात्रौ ठिक 10 वाजता सुरु होणार असून नाट्य रसीकांनी दशावतार नाट्य प्रयोगचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री भगवती उत्साही मंडळ आणि बारा पाच मानकरी यांनी केले आहे.












