लोकांच्या उद्रेगाची निखिल कन्स्ट्रक्शन कडून दखल ! युद्धपातळीवर रस्ता खड्डे मुक्त करा –हॅम अधिकाऱ्यांचे आदेश !

…आणि अखेर हवेली नगर पासून साईड पट्टीवर टाकलेली खडी, खड्ड्यामध्ये विसावली.! अहोरात्र खड्डे भरणीला सुरुवात

ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटक आणि वाहन चालकांमध्ये समाधान !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : खड्ड्यामुळे फोंडाघाट बाजारपेठ घाट- रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत .वाहनांना व चालकांना तब्येतीच्या दुखण्याचा प्रादुर्भाव होऊन, त्रास सहन करावा लागतो आहे. दोन्ही घाट बंद असल्याने सर्व वाहने, पर्यटक, ट्रॉलर्स,कंटेनर,टँकर्स फोंडाघाटातून वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या ताकती पेक्षा, कित्येक पटीने वाहतूक सुरू असल्याने, खिंडी पासून नांदगाव तिठा पर्यंत रस्ता उखडून जीर्ण झाला आहे. पादचारी, पर्यटक, व्यावसायिक, ग्रामस्थ हैराण झाले आहेत .त्यांच्या संतापामुळे अखेर ग्रामस्थांनी तसेच उबाटाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या आठवड्यात रस्ता रोको आंदोलनाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती.

मात्र रस्ता हॅम कडे हस्तांतरित झाल्या नंतर केंद्र सरकारच्या हायब्रीड ॲम्युनिटी प्रोग्राम चे मुंबईस्थित अधिकारी, बनगोसावी (अधीक्षक अभियंता) आणि हिंगे (कार्यकारी अभियंता) यांनी तातडीने सिंधुदुर्गातील निखिल कन्स्ट्रक्शन चे मॅनेजर प्रसाद शेळके यांना युद्ध- पातळीवर सदर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवुन रस्ता वाहतुकीसाठी, सुयोग्य करावा असे आदेश पारित करून, प्रतिदिन कामाचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गेल्या दोन दिवसात मटेरियल टाकून दिवसरात्र खडी, डांबर, ग्रिट, रोलिंग ने खड्डे बुजवुन, पुन्हा खड्डे पडणार नाही याची काळजी व रस्ता सुरक्षित करण्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शन ने घेतली आहे. यावेळी लोकांनी खड्डे पुन्हा पडणार नाही याची काळजी घ्या, अशी अपेक्षा ठेकेदाराकडून व्यक्त केली आहे. यावेळी टेक्निशियन राठोड आणि स्थानिक गायकवाड यांनी योग्य रीतीने खड्डे बुजवले जातील असे सांगितले. थोडी असुविधा, वाहतूक कोंडीचा त्रास होऊन सुद्धा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने, ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटक,वाहन चालक मधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!