शालेय पोषण आहाराबाबत शासन उदानसिन,महिलांना भेडसावणारे प्रश्न

स्वयंपाकी महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेत प्रशासनाचे वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शालेय पोषण आहारा बाबत शासनाची उदानसिनता, व स्वयंपाकी महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी स्वयंपाकी महिलांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.जोर-जोरात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.

शालेय मुलांना माध्यान्ह भोजन मिळाल्यास त्याची गुणवत्ता वाढते याचा अभ्यास करून केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून देशभरात मध्यान भोजन ही योजना राबविली जाते.पण राज्य शासन त्याकडे गांभीर्याने पहात नाही. मात्र मरमर आगीसमोर जेवण शिजवून विद्यार्थ्याना जेवन घालणाऱ्या स्वयंपाकीना मात्र ऑक्टोबर २०२४ पासूनचे मानधन सरकारने दिलेले नाही,भाजीपाला वइंधन बील जूनपासून दिलेले नाही.जूनमध्ये १ हजार रूपये मानधनवाढ सरकारने जाहीर केली. पण मंत्रीमंडळात ठराव होऊनही अद्याप शासन निर्णय काढलेला नाही. त्यामुळे महिलांची फसवणूक झाली आहे.काही स्वयंपाकीना मनमानीपणे मुख्याध्यापक व स्थानिक कमिटीने कामावरून कमी केले,त्याची तक्रार ,चौकशी झाल्यावरही त्याना अद्याप शिक्षणाधिकारी यांच्याकडून न्याय मिळालेला नाही .हे सर्व असह्य झाल्यामुळे या सर्व समस्याकड़े शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वयंपाकी संघाचे अध्यक्ष कमलताई परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी जिल्ह्यातील शेकडो स्वयंपाकीनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाकड़े सादर केले

error: Content is protected !!