मुणगे येथे श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या मार्फत बनविण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवालय सभामंडप येथे करण्यात आले. यावेळी देवस्थान अध्यक्ष ओमकार पाद्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, मुणगे सोसायटी चेअरमन गोविंद सावंत,भगवती हायस्कुलचे शिक्षक प्रसाद बागवे, उत्तम लब्दे, दादा वळंजू, तातू पुजारे, सरिता गुरव, आशिष आईर, प्रमोद वळंजू, विश्वास मुणगेकर
योगेश लब्दे आदी उपस्थित होते. दिनदर्शिका संकलन साठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय लब्दे, सचिव योगेश सावंत, खजिनदार सुनिल हिर्लेकर, सदस्य तुषार मुणगेकर, अक्षय पुजारे, मंगेश बोरकर, संदेश घाडी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!