मसुरे (प्रतिनिधी) : गोळवण येथील होबळीच्या बंधाऱ्यात फळ्या टाकून पाणी अडवण्याचा शुभारंभ सरपंच सुभाष लाड,उपसरपंच शरद मांजरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बंधारा बांधल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाताडे, मिलींद पवार, संदेश पवार, नंदकुमार पवार, तळवडेकर , विजय सावंत, संतोष गावडे, महादेव पवार, रामकृष्ण नाईक, दत्ताराम परब,कदम सर, रवींद्र गावडे सर, तसेच वराडकर हायस्कूल कट्टा चे विद्यार्थी उपस्थित होते.