ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा नेत्र रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील नेत्र शस्त्रक्रिया गृहामधील ऑपथालमीक ऑपरेटींग मायक्रोस्कोप निकामी झालेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथुन देणेत येणा-या निःशुल्क मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा काही दिवसांपासून बंद झालेल्या होत्या. मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा बंद झालेने रुग्णांची गैरसोय होत होती. या सेवा लवकर सुरु करुन रुग्णांची गैरसोय दुर करणेसाठी रुग्णालय स्तरावरुन नवीन मायक्रोस्कोप प्राप्त करणेोठी प्रयत्न सुरु होते. त्याची दखल शासन स्तरावर घेणेत आली व महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण मुंबई यांचेकडील पुरवठा आदेशानुसार मे. अप्पासामी कंपनीकडुन नवीन ऑपथालमीक ऑपरेटींग मायक्रोस्कोपचा पुरवठा ३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा नेत्र रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे करणेत आला. त्याचबरोबर ऑटोरीफक्टोमिटर वीथ कॅरोटोमीटर, ए स्कॅन बायोमिटर, एलईडी स्लीट लॅप, नॉन कॉनटॅक्ट टोनोमिटर, कॅटरॅक्ट व स्क्वींट आणि ग्लाकोमा ऑपरेशन सेट ही यंत्रसामुग्री नेत्र रुग्णालयाकरीता आलेली आहे. ही सर्व सामुग्री नेत्र रुग्णालयात स्थापीत करणेत आलेली आहे. नेत्र शस्त्रक्रिया गृहातील नवीन यंत्रसामुग्रीचे ओ.टी स्वाब नमुने मायक्रोबायोलॉजी तपासणीकरीता प्रयोगशाळेकडे पाठविणेत आलेले आहे. ३ वेळा ओ.टी स्वाब नमुने तपासणी निगेटीव्ही आलेनंतरच नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे फयुमिगेशन होऊन, बंद असलेल्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया जानेवारी २०२५ च्या शेवटच्या आठवडयात सुरु होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच. पाटील यांनी दिली आहे.