मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक पार पडली

भ्रष्टाचार, अवैध, अनधिकृत बाबींसाठी माझी Zero Tolerance हीच निती असेल

रत्नागिरी (प्रतिनिधी) : किनारपट्टी सुरक्षा हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे यात कुठेच तडजोड चालणार नाही. गेल्या वर्षभरात जो अवैध मासेमारीवर दंड आकारला त्याची शंभर टक्के वसुली झाली नव्हती. हे आता चालणार नाही. नियमबाह्य काम करण्यांकडून १००% दंड वसूली व्हायलाच हवी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असे आदेश यावेळी दिले !

रत्नागिरीतील अनाधिकृत बोटी, एलईडी लाईट मध्ये होत असलेली मासेमारी, किनारपट्टीवर अनेक अवैध बांधकाम यासंदर्भात तात्काळ कठोर पावलं उचलण्यासाठी संबंधितांना आदेशीत केले.

खात्याला आवश्यक ते संपूर्ण बळ मिळेल, गस्ती नौका स्टीलच्या दिल्या जातील, रत्नागिरी मध्ये अजून दोन ड्रोन वाढवून दिले जातील, गस्ती नौका वाढवून देण्याचा प्रयत्न करू या सर्व बाबींसाठी आश्वस्त केले.

तसेच यावेळी, येत्या एक वर्षाच्या उत्पादन वाढीचा आराखडा तयार करण्यास सांगितले. महाराष्ट्राचे व पर्यायाने देशाच्या उत्पादन वाढीत मोलाचा वाटा उचलण्याची क्षमता कोंकणात आहे, त्यामुळे आता टारगेट ओरिएंटेड काम करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र. सहाय्यक आयुक्त आनंद पालव, प्रविण गोळवलकर, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त ना. वि. भादुले, सीमाशुल्क अधीक्षक पवन राठी, निरीक्षक राजेश लाडे आदी उपस्थित होते.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच रत्नागिरी भाजप सदस्य नोंदणी बूथला सदिच्छा भेट दिली.

error: Content is protected !!