खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही एक जुनी आणि प्रमुख शैक्षणिक संस्था असुन या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे दिले जात असून सन २०१२ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मध्ये शिक्षण देण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली गेली. यु.जी.सी संचलित नॅशनल असेसमेंट अँन्ड अँक्रिडिएशन काऊंसिल (नॅक) द्वारे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याची परीक्षण केली जाते. परीक्षण केल्या नंतर महाविद्यालयास योग्य आणि उचित मानांकन देण्यात येते.
या महाविद्यालयाचे नॅकद्वारे दि. ०८ व ०९ जानेवारी रोजी परीक्षण केले गेले. परिक्षणासाठी गठण करण्यात आलेल्या परीक्षण समिती मध्ये समिती अध्यक्ष म्हणून झारखंड येथील कोल्हान विद्यापीठ, जमशेदपूर, च्या कुलगुरू डॉ. शुक्ला महंती, तसेच समिती समन्वयक डॉ. प्रेमलथा पी. एन. तामिळनाडू तर सदस्य म्हणून केरळ येथील डॉ. फ्रान्सिस सनी होते. झालेल्या महाविद्यालयाच्या परीक्षण, पाहणी व पडताळणी या संदर्भात नॅक द्वारे निकाल जाहीर झालेला असून या महाविद्यालयाने २.३२ गुण. मिळवून “बी” श्रेणीत स्वतःचा स्थान मिळवलं.
महाविद्यालयाच्या या घवघवीत यशा मध्ये समाजातील सर्वच घटकांचा समावेश आहे. सर्व स्तरातुन या यशाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे. हे यश संपादन करण्यामध्ये संस्थाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रविण लोकरे तसेच सर्व संचालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम सय्यद – समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या प्रमाणिक प्रयत्नांचे फळ असे म्हणणेच योग्य ठरेल.
