हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त असलदेतील शिवसेना शाखेत जयंती व हळदीकुंक समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली तालुख्यतील असलदे गावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शाखेत ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी दहा वाजता हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली व दुपारी चार वाजता महिलांना साठी हळदीकुंकू समारंभ आयोजन करण्यात आले होते. तरी सदर कार्यक्रमास असलदे गावातील व पंचक्रोशीती असंख्य महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, तालुका प्रमुख माधवी दळवी, उपतालुका प्रमुख संजना कोलते, उपशहर प्रमुख दिव्या साळगावकर, शाखाप्रमुख कणकवली रोहिणी पिळणकर, महिला विभाग प्रमुख सारिका खरात, तालुका सदस्य सुरेश मेस्त्री, युवासेना विभाग प्रमुख जयप्रकाश पाताडे, शाखा प्रमुख संजय डगरे, उपशाखा प्रमुख विजय डामरे, महिला शाखा प्रमुख स्वरा डगरे, असलदे ग्राप सदस्य सपना डामरे, बूथ प्रमुख सचिन लोके आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!