खारेपाटण प्रा.आ.केंद्र शवगृह इमारत व रस्ता कमाचे भूमिपूजन संपन्न….

सुमारे २५ लाख रुपये चा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील प्रा.आ केंद्रातील शवगृह नवीन इमारतीचे व प्रा.आ.केंद्र येथील अंतर्गत परिसर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज सोमवारी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रणय गुरसाळे, ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले, जयदीप देसाई, शीतिजा धुमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार वैद्यकीय अधिकारी डॉ निलोफर जमादार, आरोग्य सहाय्यक के एस वानोळे इत्यादी मान्यवर तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक नियोजन बजेट सन २०२३ -२०२४ मधून मंजूर झालेल्या या कामासाठी सुमारे २५ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून खारेपाटण प्रा.आ.केंद्र शवगृह इमारत बांधणी कामासाठी १० लाख रुपये तर प्रा.आ.केंद्रातील इमारत परिसरातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरन कामासाठी सुमारे १५ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून एकूण २५ लाख रुपये एवढा या कामावर खर्च करण्यात येणार आहे. याबद्दल खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व विद्यमान पालकमंत्री नामदार नितेश राणे व खासदार नारायणराव राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!