कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने एसटी तिकीट दरवाढ केल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली बसस्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार जिजी उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपनेत्या जान्हवी सावंत, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कणकवली तालुक्यातील शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना संलग्न संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी तसेच सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.
कणकवलीत एसटी तिकीट दरवाढ विरोधात गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चक्का जाम आंदोलन
