अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचे समाजभान
मसूरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट भूषण स्वामिरत्न पुरस्कार प्राप्त तसेच श्री स्वामी समर्थ मठ हडपिडचे संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे या हेतूने बाविस हजार रुपये किमतीचा (UF+UV+zink and copper booster) एक्वागार्ड शाळेला प्रदान केला.त्यामुळे नियमितपणे शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी निर्धोक पाणी मिळणार आहे.भविष्यात विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या दातृत्वा बद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रचना राजाराम कडू,उपाध्यक्ष संजय लवू राणे व सर्व सदस्य,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ,मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी व पालकांनी आभार व्यक्त केले.
