कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रखडलेला व जनतेचा महत्त्वाचा असलेला प्रश्न हळवल रेल्वे उड्डाणपूल हा मार्ग लागणार असून पंचक्रोशीतील अनेक गावांना रेल्वे फाटक पडत असल्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे. कणकवली तालुक्यातील हळवल कळसूली, आम्रड रस्ता मार्गावर हलवल रेल्वे फाटक सातत्याने पडत असताना वागदे,शिरवल,कसवन, तळवडे कळसुली ,आदी गावांना सातत्याने याचा प्रवास करताना त्रास होत असेल हे गरज लक्षात घेताना भाजपच्या तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून या संदर्भात खासदार नारायण राणे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना सूचना देऊन तात्काळ या संदर्भात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात ज्या बाबी पूर्तता करावायच्या आहेत त्या तात्काळ कराव्यात अशा सूचनाही दिल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असे भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री यांनी सांगितले

