तरंदळे – तळेखाेलवाडी येथे श्री गणेश मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व माघी गणेश जयंती उत्सव

गुरुवार 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत हाेणार संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे तळेखाेलवाडी येथे नवीनच उभारणी करण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा व माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे त्यानिमित्त धार्मिक विधी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.30 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता श्रींची वाजत गाजत मिरवणूक, शुक्रवार 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वा.गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, वास्तुदेवता, गृहदेवता, ब्रह्मादिमंडळ देवता स्थापन, सकाळी 10 वाजता नवग्रह हवन, वास्तु हवन, वास्तुनिक्षेप, दुपारी 12 वा. कलश व गणपती जलाधिवास, कलश हवन व कलशाराहेण, दुपारी 1.30 समारोप व गणपती निद्रासन, शनिवार दि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. गणपती निद्रासन व जागृतीकरण, सकाळी 9 वा.गणपती मूर्ती स्थापन, सकाळी 10 वा. गणपती तत्व हवन, दुपारी 11 वा. तत्व चढवून प्राणप्रतिष्ठा, दुपारी 12 वा. पूर्णाहुती,दुपारी 12:30 वाजता महाआरती,दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 वा.महिलांचे हळदीकुंकू, सायंकाळी 7 वा. स्थानिक व निमंत्रित भजने.

श्री गणेश मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा व माघी गणेश जयंती उत्सवास व आयाेजित कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओमकार प्रासादिक मंडळ, तरंदळे तळेखाेलवाडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!