श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कणकवली कडून माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन !

कणकवली (प्रतिनिधी) : १४ विद्या ६४ कलांची देवता, कार्यारंभाची देवता, देवांचा देव गणाधीश, गौरीनंदन, श्री सिद्धिविनायक, सर्वांचा लाडका, नवसाला पावणारा – हाकेला धावणारा – श्री गणाधीशाचा माघी गणेश जयंती उत्सव शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी, उपजिल्हा रुग्णालयासमोर – नरडवे रोड, कणकवली येथे सलग सोळाव्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने शुक्रवार तारीख ३१ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीगणेश मूर्तीचे जल्लोषात आगमन होईल. शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना व पूजा, आठ वाजता श्री सत्यनारायण पूजा, सकाळी दहा वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद. दुपारी तीन वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ जानवली – बुवा रवी राणे, चार वाजता श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवे- बुवा अमेय आरडेकर, सायंकाळी पाच वाजता श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, जाणवली, बुवा उदय राणे. सायंकाळी सात वाजता आई जयंती देवी प्रसादिक भजन मंडळ, पळसंब,बुवा – अनिल परब यांची भजने होतील. आठ वाजता महाआरती होईल .रात्री नऊ वाजता ओमकार दशावतारी भजन मंडळ,वेंगुर्ला यांचे महान पौराणिक दशावतारी नाटक ” गंधर्व उद्धार ” आयोजित केले आहे .तरी सर्व गणेश भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन सहकार्य करावे.असे आवाहन श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ कणकवली यांचे कडून करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!