३१ जाने रोजी दिंडी भजन तर १ फेब्रुवारी रोजी चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा कार्यक्रम विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : श्री गणेश मंदिर वायंगणी (श्री देव रवळनाथ मंदिर वायंगणी) येथे माघी गणेशोत्सव शुक्रवार ३१ जानेवारी ते शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार असून हा २५ वा वर्धापन दिन सोहळा असून शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. गणेश याग, दु. १२ ते १ महाआरती, दु. १ ते ३ महाप्रसाद, सायं. ७ ते ७.३० आरती, रात्रौ. ९ .३० वा. पावणाईदेवी प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ किंजवडे यांची ट्रिकसीन दिंडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा. सत्यनारायण महापूजा, दु. १२ ते १ वा. महाआरती, दु. १ ते ३ महाप्रसाद, दु. ३ ते ४ महिला हळदी कुंकू समारंभ, ४ ते ७ सुस्वर भजने, सायं ७ ते ७.३० आरती, रात्रौ ९.३० वा. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रवळनाथ गाव-हाटी देवालय समिती वायंगणी यांनी केले आहे.