दर्पण प्रबोधिनीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर!

पाचवीतून अर्णव भिसे, आठवीतून जस्मिता पावसकर प्रथम

मसूरे (प्रतिनिधी) : प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धात्मक टप्प्याला सामोरे जाताना त्यांच्या मनात अनामिक भिती आणि न्यूनगंड असतो.शिष्यवृत्ती परीक्षेचे दडपण दूर व्हावे आणि निर्भयतेने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा,यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने इ.पाचवी आणि आठवीच्या मराठी माध्यम च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन कणकवली कॉलेज ,कणकवली येथे करण्यात आले होते. परीक्षेसाठी जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला होता.या सराव परीक्षेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे

इ.पाचवी गुणानुक्रमे पहिले १० विद्यार्थी
१) अर्णव राजाराम भिसे- शाळा हरकूळखुर्द गावडेवाडी, गुण-२५६
२)निरज शेखर परब-एस. एम. हाय. कणकवली, गुण-२५२
३)गौरांग सागर वायंगणकर-शाळा बिडवाडी नं.१, गुण-२४४
४)प्रथमेश सिताराम लांबर-शाळा आडेली नं.१, गुण-२४४
५)पियुषा मिलिंद घोणे-शाळा वजराट नं.१, गुण-२३६
६)शुभम अनंत गावडे-शाळा ओझरम मापार, गुण-२३६
७)माही राजाराम घोंगे-शाळा वजराट नं.१ ,गुण-२३४
८)विभा गिरीष धुमाळे-शाळा खारेपाटण नं.१, गुण-२१८
९)चैतन्य मनोज गवाणकर-शाळा लोरे नं.१, गुण-२१२
१०)गौरवी सचिन देसाई-शाळा दिगवळे बामणदे ,गुण-२१०

इ.आठवी गुणानुक्रमे १० विद्यार्थी
१)जस्मिता संजय पावसकर-एस. एम. हाय.कणकवली, गुण -२१०
२)वरद उदय बाक्रे-विद्यामंदिर कणकवली, गुण-२०६
३)मुग्धा मिलिंद जांभवडेकर- विद्यामंदिर कणकवली, गुण-२००
४)किंजल जयवंत रेवाळे-विद्यामंदिर कणकवली, गुण-१९२
५)लावण्या राजेश सावंत-कनेडी हायस्कूल, गुण-१९०
६)शार्दुल मंदार चव्हाण-एस एम. हाय. कणकवली, गुण-१८८
७)सम्यक चंद्रकांत पुरळकर-विद्यामंदिर कणकवली, गुण-१८६
८)अद्वैत प्रसाद मिरजकर-एस एम. हाय. कणकवली, गुण-१८४
९)देविका संतोष राऊळ-विद्यामंदिर कणकवली, गुण-१७८
१०) बुद्धिकेश सुनिल डांगमोडेकर-विद्यामंदिर कणकवली, गुण-१७६

इ.पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्य़ात १५० विद्यार्थी आणि इतर.आठवीसाठी २७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. बहुसंख्य विद्यार्थी पात्र ठरले आहेत. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जयभीम महोत्सवात गौरव केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!