श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे 1 फेब्रुवारी राेजी कलमठ नाडकर्णीनगर येथे आगमन

कणकवली (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमेचे शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी कलमठ नाडकर्णीनगर येथील विश्राम विश्वनाथ रासम यांच्या ”पुण्याईप्रासाद” या निवास्थानी सकाळी 9 वा आगमन होणार आहे.

पालखी पादुकांचे आगमन झाल्यानंतर सकाळी 9.15 ते 10.30 वा.पर्यंत स्वामींची पाद्य पूजा व अन्नपूर्णा आईंची महापूजा,त्यानंतर महाआरती, दुपारी 11:45 ते 4 वाजेपर्यंत भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

भाविकांनी स्वामी समर्थ पालखी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्राम रासम परिवार व स्वामी समर्थ भक्त परिवार कलमठ नाडकर्णीनगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!