एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयात साप्ताहिक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : एस. एस. पी. एम अभियांत्रिकी महाविद्यालयात २० जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान “Principles, Techniques and Perspectives on Optimization Techniques in Engineering Applications and Future Trends” या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव चे प्राध्यापक डॉ. अशोक जी मतानी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे समन्वयक प्राचार्य डॉ. दुरादुंडी सावंत.बाडकर आणि सहसमन्वयक प्रा. श्रीमती सुप्रिया नलावडे होते. कार्यशाळेमध्ये एकूण १२ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते आणि यात देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. दुरादुंडी सावंत.बाडकर यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर भाष्य केले. तज्ज्ञांनी सादरीकरणाद्वारे मुख्य मुद्दे जसे डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग इत्यादी यावर विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेत तज्ज्ञांनी ” ऑप्टिमायझेशन ” तंत्रज्ञानाच्या आधुनिक पद्धती आणि त्याचा उपयोग विविध उद्योगांमध्ये कसा केला जातो, यावर सखोल चर्चा केली. तसेच, भविष्यातील ट्रेंड्स, तंत्रज्ञानातील बदल, आणि रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील प्रमुख विषय आणि तज्ज्ञ: • डॉ. अशोक जी मतानी, जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, यांनी “AI & ML in Engineering Optimization: Current Trends & Future Prospects” या विषयावर आपले विचार मांडले.
• डॉ. शामला महाडीक यांनी ““Optimization Techniques in Engineering’s” यावर मार्गदर्शन केले.
• डॉ. तृप्ती प्रकाश बन्सोडे यांनी “Optimization in Neural Networks” या विषयावर सत्र घेतले.
• डॉ. सत्यध्यान चिक्केरूर, सीएआयआर सेंटरचे संचालक, यांनी “Deep Learning- Advanced Neural” यावर चर्चा केली.
• डॉ. पुष्पा पाटील यांनी “Image Retrieval using Machine Learning Techniques” यावर मार्गदर्शन केले.

• सुशांत रमेश डगरे यांनी “Optimization techniques in data Analytics” या विषयावर सत्र घेतले.
कार्यशाळेत उपस्थित सहभागी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या नवीन कल्पना समजल्या. सत्राच्या शेवटी ऑनलाईन चाचणी आणि फीडबॅक घेऊन सत्राची फलनिष्पत्ती मोजली गेली. कार्यशाळेचा समारोप २५ जानेवारी रोजी सायंकाळी ८:३० वाजता करण्यात आला. या कार्यक्रमामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातल्या प्राध्यापकांना भविष्यातील ट्रेंड्स आणि ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले. तर या कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव मत्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कौतुक केले.

error: Content is protected !!