विद्यार्थ्यांच्या सिरीन कोस्टल गारमेंटचे सर्व स्तरातून कौतुक

फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंगचे ‘आरंभ ‘ प्रदर्शन

सार्था किशोर कदम यांची नाविन्यमय कल्पना

मसूरे (प्रतिनिधी) : फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर ॲड फॅशन डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सिरीन कोस्टल वस्तूंचे मनमोहक आकर्षक पद्धतीने दर्शन घडविण्यात आले. याचे समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले. प्रदर्शनाचे उद्घघाटन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या उपस्थित करण्यात आले असल्याची माहिती फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या संचालिका सार्था किशोर कदम यांनी दिली.

उद्घघाटन सत्राला कंजूमर सोसायटीचे अध्यक्ष संदीप नलावडे,अभिनेते निलेश पवार, प्रवीण नाईक आणि फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंगचे सल्लागार कवी किशोर कदम आदी उपस्थित होते. या प्रदर्शनासंदर्भात बोलताना सार्था कदम म्हणाल्या, हे कलेक्शन फ्लोरेट कॉलेजमधील फॅशनच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते, ते किनारी जीवनाच्या शांत सौंदर्याला दर्शवते. निळा, करडा, वाळूसारखा रंग, ऑफ-व्हाइट आणि हलका हिरवा अशा शांत रंगछटांमधून ते सहजसुंदरतेचा आणि किनारी सौंदर्याचा नैसर्गिक मोहकपणा साकारते.कोस्टल शीक म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याने प्रेरित साधी, आरामदायक आणि तरीही स्टायलिश फॅशन शैली. यामध्ये हलके, नैसर्गिक कापड, मऊ रंगछटा (निळा, पांढरा, वाळूसारखा रंग) आणि साध्या, तरीही सुंदर डिझाईन्सचा समावेश असतो. ही शैली समुद्रकिनाऱ्याच्या शांततेचे आणि सहजतेचे प्रतीक आहे.

या प्रदर्शनातील सर्व गारमेंट्स हे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आहेत.त्यामध्ये चिल्ड्रन्स वेअर किंवा लहान मुलांचे कपडे हे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी फ्री एम्ब्रोईडरी तसेच मुलांना सूटेबल असे डिझाईन एलिमेंट्स वापरले.वुमन्स वेअर हे सेकंड ईयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी सिम्पल डिझाईन व रंगछटांचा योग्य वापर केला आहे. एखाद्या व्हेकेशन किंवा सुट्टीवर असणाऱ्या माणसांना जसे रिलॅक्स व स्टायलिश आऊटफिट्स आवडतील अशा रीतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेन्स वेअर हे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केले. यामध्ये त्यांनी आपल्या रोजच्या शर्ट पॅन्टच्या आऊटफिटला थोडासा वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांचे कपडे डिझाईन करताना तीन ते चार पाच ते सात व आठ ते दहा या तीन वयोगटांचा विचार करण्यात आला.

तसेच वुमन्स वेअर डिझाईन करताना वेगवेगळ्या आकाराच्या डिझाईन करण्यात आले. या कलेक्शन मध्ये 65 पेक्षा जास्त गारमेंट तयार करण्यात आली असून ती सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः बनवली आहेत. अगदी एम्ब्रॉयडरी पासून ते बीड वर्क, शिवणकाम, फॅब्रिक सोर्सिंग सर्व विद्यार्थ्यांनी केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व गारमेंट्सचे अगदी प्रोफेशनल स्वरूपाचे फोटोशूट आचरा देवगड व मालवण या किनाऱ्यावर जाऊन केलेले होते. त्याचा कॅटलॉग सुद्धा प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता.मुलांनी केलेले इतर उपक्रम सुद्धा ह्या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते.या प्रदर्शनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामवंत इंटेरियर डिझायनर फॅशन डिझायनर डॉक्टर्स वकील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचे पालक सर्व कॉलेज येथील विद्यार्थीनी भेट देऊन पाहाणी केली. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे स्टाफ शैलेश कदम, साक्षी खोपटकर, आर्या बिडये, मिसबा मृणालीं सातारकर, मृणालीं गावडे व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली होती.

error: Content is protected !!