१ ऑक्टोबर २०२३ पासून पगारवाढ लागू , ३० जून २०२७ पर्यंत करार मुदत
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना सरासरी ६.३१ टक्के पगारवाढ देणारा करार शुक्रवारी कर्मचारी संघटना को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज सिंधुदुर्ग आणि जिल्हा बँक यांच्यात झाला. राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी या करारावर स्वाक्षरी केली. १ ऑक्टोबर २०२३ पासून हा करार लागू असून ३० जून २०२७ पर्यंत ३ वर्ष ९ महिने हा करार लागू राहणार आहे. या करारात १ एप्रिल २०२५ पासून बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना बँक अध्यक्ष दळवी यांनी, कराराच्या अनुषंगाने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यावेळी संचालक व मंत्री राणे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अडसूळ, जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक मेघनाथ धुरी, प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, गणपत देसाई, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, निता राणे, आत्माराम ओटवणेकर, रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये, विद्याप्रसाद बांदेकर, महेश सारंग, विद्याधर परब, समीर सावंत, व्हिक्टर डांटस यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.