माघी गणेश जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन
२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर वैभववाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव तसेच मंडळाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शनिवार दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात एकुण २८ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदविला. तर इतर ५ रक्तदात्यांचे वैयक्तिक वैद्यकीय कारणांस्तव रक्तदान होऊ शकले नाही. वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांनी रक्त संकलन केले.
याप्रसंगी श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष गणेश मोहिते, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे अध्यक्ष राजेश पडवळ. जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांचे कर्मचारी तसेच सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.