फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षी सर्वांनाच अक्कलकोट श्रीक्षेत्री जाऊन स्वामींचे दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट न्यासाच्या वतीने स्वामींच्या पालखी-पादुकांचे दर्शन व्हावे, यासाठी परिक्रमेचे नियोजन करण्यात येते.या परिक्रमेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यातून स्वामी भक्तांना सेवेची संधी प्राप्त होते. तारीख २१-११-२४ रोजी अक्कलकोट येथे सुरू झालेली ही पालखी- पादुका दर्शन परिक्रमा तारीख २६-०६-२५ रोजी पुन्हा स्वगृही, श्रीक्षेत्री पोहोचणार आहे…
फोंडाघाट मारुती मंदिर, राधाकृष्ण मंदिर येथून गुरुवार तारीख ६ फेब्रुवारी रोजी हवेलीनगर माळवाडी येथील स्वामीभक्त कृष्णकांत राणे यांचे घरी पालखी- पादुका पूजन, आरती, महाप्रसाद आणि दर्शन सोहळा आयोजित केला आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासासह कृष्णा राणे यांनी केले आहे.