नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे दिवानसाने वाडी ग्रामस्थ मंडळ यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.
सालाबाद प्रमाणे सकाळी गणेश पूजन व सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर आलेल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता गावातील संगीत भजन व रात्री नऊ वाजता मनोरंजनाचे कार्यक्रमात 20/20 डबलबारी भजनाचे आयोजन करण्यात आले या उत्सवासाठी नांदगाव पंचक्रोशीतील अनेक गणेश भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.