माऊलीनगर मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती साजरी

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रमाचे उद्धाटन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे माऊलीनगर मित्रमंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्धाटन संपन्न झाले. माऊलीनगर मित्रमंडळाच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत अनिल जाधव, संतोष जाधव, सूर्यकांत जाधव, नमानंद मोडक, रमेश जाधव, विजय जाधव, संतोष जाधव, मंगेश जाधव आदी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!