बांदिवडे येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघामार्फत बांदिवडे पालयेवाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर होणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ग्रामस्वच्छता अभियान, 17 फेब्रुवारी रोजी शाळेतील मुलांच्या चित्रकला स्पर्धा, 18 फेब्रुवारी रोजी बचत गटांच्या रांगोळी स्पर्धा (शिवकालीन / संतकालीन विषयावर आधारित), 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकाळी 9.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन, महाआरती, खाद्य वाटप, गावातून मोटार सायकल रॅली, सायंकाळी 4.30 नंतर मुलांचे भाषण, पोवाडा, गायन , सायंकाळी 6.30 वाजता महाराजांच्या चरणाशी 395 दिव्यांचा दीपोत्सव आणि 7.00 नंतर जिल्हापरिषद शाळा नंबर 1 आणि 2 यांच्या एकांकिका आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!