कळसुली येथे संत शिरोमणी रविदास जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने राष्ट्र संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कळसुली चव्हाणवाडीतील सर्व ज्येष्ठांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला, वाडीतील सर्व महिलांनी हळदीकुंकू आणि फनी गेम्स मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्ये वृषाली अजित चव्हाण आणि श्वेता हेमंत चव्हाण या दोघी विजयी ठरल्या, तसेच सुरज प्रकाश परब तळवडे, सावंतवाडी पुरस्कृत कार्यक्रमास खास आकर्षण मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये नीलम नामदेव जाधव, नामदेव जाधव, महानंद चव्हाण, महेंद्र चव्हाण, कृष्णा चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, सत्यविजय जाधव, अनिल चव्हाण, उपसरपंच गजानन मटकर अशी उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले. तसेच प्रस्तावना व आभार प्रदर्शन सचिव कृष्णा लक्ष्मण चव्हाण यांनी केलं. सदर कार्यक्रमांमध्ये संत रोहिदास उन्नती मंडळ कळसुली चे सर्व संचालक तसेच सल्लागार आणि श्री संत रोहिदास महाराज स्वयं सहायता महिला मंडळ यांचं मोलाचं योगदान लाभले.

error: Content is protected !!