आचरा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

ऐश्वर्या तोडणकर हिचा उंच उडी या प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक

ऐश्वर्या हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे पिरावाडी शाळेची विद्यार्थीनी

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2024-25 नुकताच ओरोस येथील डॉन बॉस्को मैदानावर संपन्न झाला. हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडीच्या शाळेने रनिंग, उंच उडी, रिले व खो-खो या क्रीडा प्रकारात 15 मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्व मुलांची तालुकास्तरावरून जिल्हा स्तरासाठी निवड झाली होती. यामध्ये ऐश्वर्या महेश तोडणकर हीने उंच उडी या प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. यामुळे आचरा गावच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा शिरा रोवला गेला आहे. याबददल जिल्हा परीषदेकडून तिला शिष्यवृत्ती मिळणार आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, उपाध्यक्ष पूर्वा तारी,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षक, पालक यांनी तीचे अभिनंदन केले आहे. यापूर्वीही सिध्देश गावकर, रूद्र बागवे जिल्हास्तरावर या स्पर्धामध्ये यश प्राप्त केले होते. ऐश्वर्याने हीने यशाची परंपरा कायम राखत शाळेच्या लौकीकात भर घातली आहे.

error: Content is protected !!