प्राथमिक शिक्षकांचा शिक्षणाधिकारी दालनासमोर ठिय्या
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे पगार देवगड गटशिक्षणाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे 17 दिवस उलटूनही झाले नाहीत याचा उद्रेक आज झाला व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग कडून प्राथमिक शिक्षणाधिकारी दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांची प्रचंड उपस्थिती राहिली.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस ,राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर,जिल्हासरचिटणीस तुषार आरोसकर,राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर व सचिन मदने,जिल्हा शिक्षक नेते सुरेखा कदम,जिल्हा उपाध्यक्ष रूपेश गरूड, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर,माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे,कायदेशीर सल्लागार संतोष कदम,सेवानिवृत्त शिक्षक भाऊ आजगावकर ,कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक ,कणकवली अध्यक्ष टोनी म्हापसेकर ,मालवण अध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड,सावंतवाडी अध्यक्ष समीर जाधव,वेंगुर्ला,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सिताराम नाईक,दोडामार्ग अध्यक्ष महेश काळे,सर्व राज्य,जिल्हा व तालुका पदाधिकारी ,जिहयातील प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.