सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित वकील अनिल निरवडेकर यांची महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ॲड. अनिल निरवडेकर यांनी महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असोसिएशन मार्फत भरविण्यात येणाऱ्या राज्यभरातील स्पर्धेमध्ये यापूर्वी विशेष प्राविण्य दाखवलेले होते. जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, वकील व न्यायाधीश वर्ग यांच्यात गेली पंचवीस वर्ष जानेवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येतात. त्यामध्ये हि ॲड. अनिल निरवडेकर यांनी बरीच पारितोषिके यापूर्वी मिळवलेली आहेत. ॲड. अनिल निरवडेकर हे सावंतवाडी जिमखाना मैदानात नियमित क्रिकेटच्या सरावासाठी उपस्थित असतात. ते क्रिकेट प्रेमी असून अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी ॲड. अनिल निरवडेकर त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.
ॲड. अनिल निरवडेकर यांची महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असो.च्या उपाध्यक्षपदी निवड…
