गायत्री ब्राह्मण मित्र मंडळाचे आयोजन
प्रथम विजेत्याला मिळणार २५ हजार आणि १ बकरा
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग येथील क्रिकेट स्पर्धेचा संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गेली 15 वर्ष मंडळ करत लिलाव हे सामने आयोजित करण्यात येतात. या हंगामातील शेवटची मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. प्रथम पारितोषिक 21 हजार व चषक आणि एक बकरा, द्वितीय पारितोषिक 15001 आणि चषक, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर पुरस्कार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उगवता तारा, अशी अनेक बक्षीस ठेवण्यात आली आहेत. या शुभारंभला गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदिप मेस्त्री, महेश गुरव, सोनु सावंत, कामगार नेते भाई सावंत, संदिप सावंत, राजु हिर्लेकर, कलमठ ग्रामपंचायत सदस्य दिनेश गोठनकर, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, प्रियाली आचरेकर, गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळाचे अशोक खाजनवाडकर, बाळा चिंदरकर, भानुदास चिंदरकर, गायत्री ब्राम्हण मित्र मंडळचे अध्यक्ष कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, जितेश बगाड, भूषण खार्जनवाडकर उपस्थित होते.