पुरातन जत्रेचा वड येथे सत्यनारायण महापूजेचे निमित्त आयोजन
कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘वेडा चंदन’ दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील पुरातन जत्रेचा वड येथे आज शनिवार १ मार्च रोजी प्रतिवर्षी प्रमाणे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सुस्वर भजन व रात्रौ ठिक १० वाजता लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ‘वेडा चंदन’ दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी नाट्य रसिकांनी दशावतार नाट्य प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
