सालवेश्र्वर कोकिसरे संघ अंतिम विजेता तर आर्या इलेव्हन कणकवली उपविजेता
खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सालवेश्र्वर कोकिसरे हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला रोख रुपये २०,०००/- व आकर्षक चषक तर आर्या इलेव्हन कणकवली हा संघ उपविजेता ठरला असून या संघाला रोख रुपये १०,०००/- रुपये व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने दि.१ मार्च ते ३ मार्च २०२५ या कालावधीत सलग तीन दिवस केदारेश्वर खारेपाटण च्या भव्य मैदानावर भरविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत कोकिसरे संघाचा खेळाडू प्रग्नेश याला धीरज जुमलेकर यांचे हस्ते उत्कृष्ट फलंदाज चशक देण्यात आला तर आर्या इलेव्हन कणकवली संघाचा खेळाडू अनिकेत याला संजय कदम यांचे हस्ते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक देण्यात आला.तसेच याच संघाचा खेळाडू सचिन याला उत्कृष्ट शेत्ररक्षक म्हणून श्री राहुल पाटणकर यांचे हस्ते चषक देण्यात आला. व याच संघाचा खेळाडू अनिकेत याला बक्षीस दाते धन्यकुमार कांबळे यांचे हस्ते मालिकावीर चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्पर्धेतील अंतिम विजेता प्रथम क्रमांकाचा चषक व २०,०००/- रकमेचे पारितोषिक बक्षिस दाते प्रकाश पाटणकर यांचे शुभहस्ते सालवेश्वर कोकिसरे या संघाला प्रदान करण्यात आले. तर उपविजेता द्वितीय क्रमांकाचा चषक व १०,०००/- रकमेचे पारितोषिक बक्षीस दाते श्रीधर पाटणकर यांचे शुभहस्ते आर्या इलेव्हन कणकवली या संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने सर्व बक्षीस दात्यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बौद्धचार्य महेंद्र पवार, संतोष पाटणकर, मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर, अशोक पाटणकर, प्रथमेश कदम, दीपक गोवळकर तसेच संघमित्रा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या संकिता पाटणकर, पूजा कदम, नम्रता जुमलेकर, वैशाली पाटणकर अंगणवाडी सेविका सविता पाटणकर उपस्थित होते तसेच पंचशील क्रिकेट क्लब चे सदस्य मकरंद पाटणकर, ललित पाटणकर प्रियाल पवार, बाळकृष्ण पाटणकर, कुणाल पाटणकर, आशिष पोमेडकर, पार्थिव पाटणकर, अमित पाटणकर, देवेंद्र कदम, रवींद्र पाटणकर, श्रवण पाटणकर, हर्षल कदम, प्रणय पाटणकर सागर सावंत, तरेष तुरालकर, रूद्र पाटणकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटणचे कार्यकर्ते भूषण जाधव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंचशील विकास मंडळाचे कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले.


















