भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व खारेपाटण हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या वतीने खारेपाटण हायस्कूलला इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सध्याच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशाने भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप या संस्थेने सुमारे एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या इंटरॅक्टिव्ह बोर्डसाठी ५० टक्के अनुदान म्हणजेच ५७५००/- रुपये प्रशालेला देणगी स्वरूपात दिले असून खारेपाटण हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाने देखील सदर इंटरॅक्टिव्ह बोर्डसाठी ५० टक्के एवढे आर्थिक सहकार्य दिले आहे. नुकतच हा इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड खारेपाटण हायस्कूल मध्ये कार्यान्वित करण्यात आला.

तसेच यापूर्वी देखील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून प्रशालेला सुमारे २५ हजार लिटर पाण्याची क्षमता असणारी पाण्याची टाकी देण्यात आली होती. त्याचा देखील प्रशालेला चांगला उपयोग होत आहे.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या या सहकार्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व शिक्षकवृंद यांनी आभार मानले आहेत. तसेच या कामी खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम देण्यात आली.त्याबद्दल पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष प्राची कांबळी, खजिनदार दिनेश तावडे, सहसचिव गौरी शिंदे, सर्व पदाधिकारी यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले.

    error: Content is protected !!