ओरोस येथे जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघाची पहिलीच बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रिक्षा चालक – मालक यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघ, अविरत कार्यरत राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकानी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिक्षा चालक-मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी केले.

ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे आज अध्यक्ष नागेश ओरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघाची पहिलीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील रिक्षा चालक-मालक यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय परिवहन अधिकारी (R T O) विजय काळे यांची भेट घेऊन रिक्षाव्यवसायिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी जुन्या रिक्षाना नवीन नंबर प्लेट बसवणे तसेच अन्य विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे मान्य केले असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. रिक्षा व्यवसायिक मयत झाल्यावर त्याचा परवाना वारस म्हणून त्याच्या पत्नीच्या नावे व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्हा रिक्षाचालक-मालक सेवा संघ आता रजिस्टर करण्यात आला असून यामार्फत आता जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील रिक्षा चालकानी आपल्या प्रश्नांबाबत एकत्रित लढा देण्यासाठी रिक्षा चालक-मालक सेवा संघामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी नागेश ओरोसकर यांनी केले. श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे आज संपन्न झालेल्या बैठकीस महेश आंबडोसकर,विजय कांबळी ,जयवंत टंगसाळी, रविंद्र माने, रविकांत चंदोसकर, धर्मेद्र सावंत, संतोष जंगले, मनोज वारे, सतीश सावंत आदि पदाधिकारी उपस्थित होते .

error: Content is protected !!