गणेश मंदिर ते भिरवंडे मुरडवेवाडी रस्त्याचे होणार नूतनीकरण
कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावा मध्ये गणपती दर्शना आ.नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या गणेश मंदिर (फटकूर मळी )ते भिरवंडे मुरडवे वाडी हा मुख्य रस्ता रुंदीकरण मजबुतीकारण व डांबरीकरण करणे हा सुमारे 3 कि मी 300 मिटर एवढ्या लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या “विकास आणि संशोधन ” या शीर्ष खाली सदरचा रस्ता मंजूर करून निधी ची तरतूद केल्या बद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आ.नितेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतल्या बद्धल समाधान व्यक्त करण्यात येत आहे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना योजनेतून “विकास आणि संशोधन ” या शीर्ष खाली देवगड कणकवली व वैभववाडी या तीन तालुक्यात एकूण 20 कि मी लांबी चे चे रस्ते होणार आहेत गणेश मंदिर ते रामेश्वर मंदिर हा 1300 मिटर चा रस्ता 5 मिटर ने डांबरीकरण व साईड पट्टी तर रामेश्वर मंदिर ते मुरडवे वाडी हा 1700 मिटर चा रस्ता 3 मिटर डांबरीकरण व साईड पट्टी असा होणार असून यामध्ये मोऱ्या बदलणे संरक्षक भिंत बांधणे चढाव कमी करणे आदी कामे होणार आहेत सदरचा रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार असून ” चेतक इंजिनिअर्स ” पुणे या एजन्सी मार्फत प्राथमिक सर्वे करण्यात आला यावेळी चेतक इंजिनिअर्स चे श्री माने, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री जाधव, संदेश उर्फ गोट्या सावंत, महिंद्र सावंत सरपंच नितीन सावंत, माजी सरपंच मिलिंद सावंत, विनय सावंत, प्रकाश घाडीगावकर, दाजी दळवी, सुनील सावंत ,कांता सावंत, विजय सावंत आदी उपस्थित होते