कणकवली (प्रतिनिधी) : SSPM काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली तर्फे आयोजित व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चमक दाखवत स्पर्धेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. प्रश्नमंजुषा, व्हिडिओग्राफी, डायरेक्ट्रो अशा वेगवेगळ्या स्पर्धा संपन्न झाल्या. जिल्ह्यातील अनेक नामवंत शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
सदर स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविणारे विद्यार्थी खालील प्रमाणे –
१) हर्ष दर्शन म्हापसेकर ७वी – प्रथम क्रमांक – (व्हिडिओग्राफी व डायरेक्ट्रो)
२) श्रेयस विजयसिंह सावंत व यश उमेश सावंत – द्वितीय क्रमांक (व्हिडिओग्राफी व डायरेक्ट्रो) – इ. ११वी विज्ञान
३) कु. यशश्री तानाजी नानचे व कु. सोनाली सुनिल ठाकूर – प्रथम क्रमांक – प्रश्नमंजुषा स्पर्धा – इ. ११वी विज्ञान
४) यश उमेश सावंत – द्वितीय क्रमांक – प्रश्नमंजुषा स्पर्धा – इ. ११वी विज्ञान
या स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनिअर कॉलेज कनेडी च्या विद्यार्थ्यांनी आपणं आणि आपली शाळा कशा पद्धतीने टेक्नोसेव्ही आहे याचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले आहे.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभ